top of page
नदीचे ‘संरक्षण’

(c) योगेश पाठक 

पुणे शहरात २०२० नंतर अनेक नवीन ‘विकास’ प्रकल्प येऊ घातले आहेत. उदा. नदी-सुशोभीकरण, शहराभोवतीचा वर्तुळाकार नवीन बहुपदरी महामार्ग, टेकडीवरून जाणारा बालभारती-पौड फाटा रास्ता इत्यादी. 

या प्रकल्पांच्या निमित्ताने माणूस आणि निसर्ग यांच्यातील बिघडत चाललेल्या नात्यावर दृष्टिक्षेप टाकणारी ही मालिका. इथे काही मूलभूत मुद्दे उपस्थित करायचा प्रयत्न केला आहे. 

नदी-सुशोभीकरण प्रकल्पाचे उदाहरण घेऊ या. नदीत अनेकदा कचरा, राडारोडा टाकण्यात येतो हि कायमची तक्रार आहे. नदी या प्रवृत्तीपासून सुरक्षित राहावी तसेच पुराचे पाणी वाढल्यास संरक्षण म्हणून काही विशिष्ट उंचीच्या भिंती नदीपात्रात उभारल्या जातील असे प्रकल्प आराखड्यात दिसते. 

एखाद्या नैसर्गिक परिसंस्थेत कचरा टाकण्यात येतो ते थांबविण्यासाठी सर्व बाजूंनी उंच भिंती बांधू या, हा उपाय कसा  काय होऊ शकतो? असे असेल तर, आपले समुद्रकिनारे, डोंगरउतार, टेकड्या, माळराने या सर्वांच्याच बाजूला उंच भिंती बांधायला हव्यात!

कचऱ्याचा प्रश्न मुळातून सोडविण्यासाठी उपभोग कमी करावे लागतील, कचऱ्याचे वर्गीकरण-रिसायकलिंग करावे लागेल, आणि  उत्पादकावर वस्तूच्या संपूर्ण जीवनचक्राची जबाबदारी द्यावी लागेल.

आपण आपल्या समस्यांच्या मूळाशी जाण्याऐवजी, दीर्घ पल्ल्याचे उपाय योजण्याऐवजी  वरवरची मलमपट्टी तर करत नाही ना? 

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2021 by EcoUniv. Proudly created with Wix.com

bottom of page