top of page
पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता आठवी 

योगेश पाठक 

 

आधी सांगितल्याप्रमाणे, तेरा वर्षाची मुले किशोरावस्थेच्या सुरुवातीमुळे एका शारीरिक व मानसिक  स्थित्यंतरातून जात असतात. तरीही त्यांच्या शिक्षणाचा बौद्धिक आवाका कायम वाढतच असतो. एखाद्या विषयाचा जास्त मोठ्या पटलावर अभ्यास करणे, खोलवर विश्लेषण करणे,  आणि संकल्पनांचे एकत्रीकरण करणे ही सर्व आव्हाने त्यांना शालेय शिक्षणात हाताळावी लागतात. 

इकोयुनिव्हच्या ‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना आठवीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.

  • वातावरण (पुढे चालू) 

    • आर्द्रता 

    • सापेक्ष व निरपेक्ष आर्द्रता 

    • सांद्रीभवन, घनीभवन

    • वनस्पतींच्या श्वसनाचे अनुकूलन: कमी आर्द्रता असल्यास श्वसनवेग वाढतो व विकिरण कमी होते. जास्त आर्द्रता असल्यास श्वसनवेग कमी होतो व वनस्पतीवरील ताण कमी होतो. 

    • वातावरणाचे तापमान, आर्द्रता, प्राण्यांची हालचाल, व त्यांचे श्वसन यातील संबंध. 

    • ढग: १० वेगवेगळ्या प्रकारचे ढग आणि त्यांचा जमिनीपासून उंचीशी संबंध 

    • ढग-पाऊस–परिसंस्था यांचा संबंध: उदा. क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रूपांतर होऊन जोरदार पाऊस पडतो त्यामुळे गवताळ परिसंस्था, नद्या इ. समृद्ध होतात आणि झाडांना काही काळासाठी फुलांचा बहर येतो. निम्बोस्ट्रेटस ढग आकाशावर एक आच्छादन टाकतात आणि त्यांच्यातून भुरुभुरु पाऊस दीर्घकाळ पडत राहतो, त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण होते आणि झाडांची वाढ होते. ढगांमुळे सूर्यप्रकाशाचे जे विकीरण होते त्याचा जंगलातील सावलीत वाढणाऱ्या झाडांना फायदा होतो आणि जलमय भूमीस्वरूप परिसंस्थांमधील ओलावा टिकून राहोत. 

    • सिरस आणि सिरोस्ट्रेटस ढग सूर्यकिरणांना अंशतः रोखून तापमानवाढ आणि हवामानबदल यांचा परिणाम कमी करतात. 

    • सिरोस्ट्रेटस आणि अल्टोक्युम्युलस ढग बर्फवृष्टी करतात तेव्हा जमिनीवर बर्फाचे आच्छादन तयार होते आणि तिचे अतिशीत तापमानापासून संरक्षण होते. यामुळे वनस्पती व भूस्थित प्राणी सुरक्षित राहतात तसेच सूक्ष्मपर्यावरणाच्या जागा तयार होतात. 

    • ढगांची निर्मिती होताना जे सांद्रीभवन/घनीकरण  होते त्यामुळे उष्णता बाहेर टाकली जाते, वातावरण उष्ण होते, आणि हवेचे मार्ग बदलतात. याचा वाऱ्यावर परिणाम होतो, त्यामुळे परागीभवनही होते आणि पक्षी स्थलांतर करू शकतात. 

  • समुद्र (पुढे चालू)

    • सागरतळाची रचना आणि तेथील वेगवेगळी भूरूपे, समुद्रतळाचा छेद

    • समुद्रतळावरील भूरूपांचे  समुद्री परिसंस्थेसाठी महत्व. उदा. भूखंडमंचावर सूर्यकिरणे पोचतात, तसेच जमिनीवरून आलेला/नद्यांनी आणलेला गाळही तेथे पोचतो. त्यामुळे तेथे माशांची वाढ जोमाने होते व त्यामुळे मासेमारीही नियमितपणे होते. सागरी गर्ता, उष्ण पाण्याचे प्रवाह आणणारी मुखे येथेही वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता असते. 

    • समुद्रातील मुख्य प्रवाह आणि त्यांची निर्मिती होण्याची कारणे 

    • सागरी प्रवाहांचे प्रकार: पृष्ठीय आणि खोलवरचे 

    • सागरी प्रवाहांचे सागरी परिसंस्थेसाठी महत्व: पोषकद्रव्यांचे वहन, मोठ्या प्रमाणावरील प्लवकनिर्मिती, उष्णतेचे नियमन, समुद्रीजीवांच्या अळ्यांचा प्रसार, स्थलांतर व अधिवास यांच्यावरील परिणाम 

  • परिसंस्था शास्त्र (पुढे चालू, व जास्त खोलात जाऊन) 

    • परिसंस्था: व्याख्या व आवाका 

    • परिसंस्थेचे घटक: जैविक व अजैविक 

    • परिसंस्थेतील द्रव्य व ऊर्जा यांचे प्रवाह व त्यांची उदाहरणे. उदा. अन्न, उत्सर्जित द्रव्य 

    • महत्वाच्या परिसंस्थांचा जास्त खोलात जाऊन अभ्यास: वन, गवताळ भूमी, जलमय भूमी, नदी, पर्वत, समुद्री, किनारी, कांदळवन 

    • परिसंस्थेची परिमाणे: जीव-संख्या (एकंदर संख्या, घनता, वयानुसार वितरण, प्रजनन, नवीन जीवांचे बाहेरून आगमन), पाण्याची गुणवत्ता, मृदेची गुणवत्ता, वातावरणाची गुणवत्ता, प्राथमिक उत्पादकता, विघटनाचा वेग, ऊर्जाप्रवाह, जैवविविधता (खाली पहा) 

    • भूचित्र - एकाच प्रदेशात असलेल्या परिसंस्थांची ‘गोधडी’, ज्यातील काही भाग मानवाच्या वापराखाली आहे 

    • भूचित्रातील परिसंस्थांचे समृद्धरीत्या जोडलेले असण्याचे निदर्शक 

    • परिसंस्थांवरील मानवी हस्तक्षेप व त्याचे परिणाम: प्रकार, तीव्रता, वारंवारता. मानव-निसर्ग संबंध समृद्ध असल्याची उदाहरणे, परिसंस्थेत/भूचित्रात राहणाऱ्या मानवसमूहांचा सामाजिक व आर्थिक अभ्यास.   

  • जैवविविधता: पुढे चालू, खोलात जाऊन, परिसंस्थांच्या संदर्भात 

    • प्रजातींची विविधता / समृद्धता आणि त्याचे परिसंस्थेतील मापन: प्रत्यक्ष अभ्यास 

    • प्रजातींची भूमिका (त्यांचे ‘काम’) व त्यांची विविधता 

    •  विशिष्ट प्रजातींचे महत्व - उदा. निदर्शक प्रजाती 

    • प्रजातींची संख्या - समतोल व असमतोल 

  • जमीनवापर आणि त्यातील बदल - औपचारिक व खोलवर ओळख 

    • ग्रामीण भागातील जमीनवापर: शेतीखालील जमीन, मानवी वस्तीखालील जमीन, सामायिक वापराची जमीन (उदा. गायराने, नदीकाठ), नैसर्गिक वने/गवताळ प्रदेश/जलमय भूमी/नद्या, तसेच प्रशासनाने “ओसाड जमीन” या नावाखाली वर्गीकृत केलेली जमीन 

    • शहरी भागातील जमीनवापर: नैसर्गिक भाग - नद्या, ओढे, टेकड्या, व याभोवती असलेले व यांना संकुचित करत असलेले संपूर्ण शहरी जग - निवासी इमारती, दुकाने व मॉल्स, कार्यालयीन इमारती, कारखाने व उद्योग, कचरा डेपो, इत्यादी 

    • शहराच्या सीमाभागातील जमीनवापर: शहरी विस्तार व उद्योग-कारखाने जिथे नैसर्गिक व ग्रामीण भूचित्रास पादाक्रांत करत असतात.

    • नैसर्गिक व ग्रामीण भूचित्रास विभाजित करणारे, छेदणारे, आकुंचित करणारे महामार्ग 

    • पर्वतीय प्रदेशातील रस्ते, त्यांचा परिणाम आणि धोके 

    • नैसर्गिक भूचित्राचे मानवाच्या अधिपत्याखालील जमिनीत होणारे अनेक दशकांमधील परिवर्तन. शहरांची बेसुमार वाढ.  

    •  रंगीत नकाशे व उपग्रहाने घेतलेले जमीनीचे फोटो वापरून जमीन वापरातील बदल अभ्यासणे. एखाद्या प्रदेशात मोठया कालावधीत झालेले बदल समजून घेणे. “भूमी आवरण नकाशे” तयार करणे, ज्यात वनाचे वेगवेगळे थर (दाट वृक्षराजीखालील जमीन, झुडूपी भाग, गवताळ प्रदेश, मोकळी जमीन) तसेच मानवाने वेगवेगळ्या कारणासाठी व्यापलेली जमीन हे सर्व वेगवेगळ्या निदर्शक चिन्हांच्या व रंगांच्या साहाय्याने दाखविले जाईल.  

  • पर्यावरणाचे आरोग्य/गुणवत्ता व सामायिक संसाधनांवर मानवामुळे होणारे परिणाम 

    • सामायिक संसाधने म्हणजे काय? स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, व जागतिक सामायिक संसाधने. त्यांची उदाहरणे. 

    • प्रदूषण: पर्यावरणाच्या आरोग्यावरील घाला 

    • हवेचे प्रदूषण: मानवनिर्मित घातक वायूंचे उत्सर्जन, नैसर्गिक स्रोत (उदा: धूळ) 

    • हवेचे मुख्य प्रदूषक 

    • हवा प्रदूषणाचा प्राणी व वनस्पती यांच्यावर होणारा परिणाम, व त्यामुळे अन्नसाखळ्या / अन्नजाळे यांच्यावर होणार परिणाम 

    • हरितगृह परिणाम 

    • आम्लवर्षा  

    • जल प्रदूषण व त्याचे स्रोत: नैसर्गिक व मानवनिर्मित  

    • मुख्य जलप्रदूषक: जैविक, मानवनिर्मित (सेंद्रिय व असेंद्रिय रसायने), शेतीतून येणारे रासायनिक खत-मिश्रित पाणी, प्रक्रिया न करता किंवा करून सोडलेले सांडपाणी, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडली जाणारी औद्योगिक रसायने

    • मृदा प्रदूषण व त्याचे स्रोत: नैसर्गिक व मानवनिर्मित  

    • मृदा प्रदूषण: मृदेची सर्जनशीलता, मृदेतील विषाचे प्रमाण 

    • कायदे: जल आणि हवा प्रदूषण, प्रदूषणाचे नियमन, पर्यावण संरक्षण यासंबंधी कायदे 

  • प्रमुख मानवनिर्मित द्रव्ये, रसायने, व त्यांचा पर्यावरणावरील परिणाम 

    • प्लास्टिक: इतिहास, प्रकार, कच्चा माल, उपयोग / उपयोगाचे चक्र , उत्पादन प्रक्रिया,  कचऱ्याची समस्या, त्याचे एकंदर प्रमाण, सूक्ष्म प्लास्टिक, त्याचा परिसंस्थांवरील परिणाम, प्राण्यांच्या खाद्यात प्लास्टिकचा प्रवेश, प्लास्टिकचा पुनरुपयोग व चक्रीकरण, त्याचे यश व मर्यादा 

    • काच: इतिहास, प्रकार, कच्चा माल, उपयोग / उपयोगाचे चक्र , उत्पादन प्रक्रिया,  कचऱ्याची समस्या, त्याचा परिसंस्थांवरील परिणाम, प्राण्यांना होणारे अपघात, काचेचे चक्रीकरण, त्याचे यश व मर्यादा 

    • इतर द्रव्ये: पतंगांचा मांजा, त्यामुळे पक्षांना होणारे अपघात व जखमा, सागरातील कचरा (उदा. नायलॉनची जाळी) व त्यामुळे सागरी जीवांना होणाऱ्या जखमा 

    • समुद्रावरील व जमिनीवरील तेलगळती, तेलाचे तवंग, वायुगळती, या सर्वांचे परिणाम 

  • मानवी लोकसंख्याशास्त्र: औपचारिक ओळख 

    • मूलभूत संकल्पना - जनगणना, लोकसंख्यावाढीचा वेग, जन्म व मृत्यूदर, साक्षरता, स्त्री:पुरुष प्रमाण, लोकसंख्येची घनता - शहर/जिल्हा/राज्य/देश यांची, व्यवसाय व त्यांचे वितरण, स्थलांतर - वार्षिक किंवा कायमचे, मानव विकास निर्देशांक, मानवी स्वास्थ्य, मानवी आनंद 

    • मानवी आयुष्यमान: प्रागऐतिहासिक काळात, ऐतिहासिक काळात, व आधुनिक वैद्यकानंतरच्या काळात

    • वाढत्या लोकसंख्येचा अन्न व पाणी या संसाधनांवर परिणाम 

    • लोकसमूहाकडून तंत्रज्ञान कसे अंगिकारले, वापरले जाते 

    • लोकसमूहाची ऊर्जेची गरज 

    • वाढत्या लोकसंख्येचा व वाढत्या आयुष्यमानाचा परिसंस्था व जमीनवापर यावर होणारा परिणाम 

    • वाढते उपभोग व त्यातील गुंतागुंतीचे तंत्रज्ञान यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या 

  • परिसंस्था व जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी होणाऱ्या अभ्याससहली / क्षेत्रभेटी यांची पूर्वतयारी कशी करावी 

  • मानवी हस्तक्षेप झालेली भूचित्रे, विशेषतः औद्योगिक प्रदेश, क्षेत्रभेटीतून अभ्यासताना तयारी कशी करावी - औद्योगिक /शहरी जमीनवापर, संसाधन वापर, प्रदूषण, कचरा, रस्ते, वाहतूक यांचा प्रत्यक्ष अभ्यास कसा करावा 

  • सजीवांचे वर्गीकरण व सूक्ष्मजीवशास्त्र  (पुढे चालू) 

    • सजीवसृष्टीचे ५ मुख्य विभाग 

    • मॉनेरा: मुख्य गुणधर्म व घटक सजीव 

    • प्रोटिस्टा: मुख्य गुणधर्म व घटक सजीव 

    • कवक: मुख्य गुणधर्म व घटक सजीव 

    • वनस्पती: मुख्य गुणधर्म व घटक सजीव 

    • प्राणी: मुख्य गुणधर्म व घटक सजीव

    • विषाणू: मुख्य गुणधर्म, रचना, विविधता 

    • जीवाणू: परिसंस्थांसाठी विघटक म्हणून महत्व, नायट्रोजनचे स्थिरीकरण, सहजीवनातील भागीदार, रोगप्रसारक  

    • प्रोटोझोआ: परिसंस्थांसाठी विघटक म्हणून महत्व, बॅक्टेरिया व प्लवक यांचे भक्षक, पाण्याच्या गुणवत्तेचे निदर्शक 

    • कवक: परिसंस्थांसाठी विघटक म्हणून महत्व, झाडांच्या मुळांबरोबरचे सहजीवन, कीटक/सस्तन प्राणी/मानव यांच्यासाठी अन्न, रोगप्रसारक

    • शैवाल: परिसंस्थांसाठी प्राथमिक उत्पादक म्हणून असलेले महत्व, वातावरणाचे नियमन, जैवइंधनाचा एक स्रोत, प्रदूषणामुळे शैवालात होणारी घातक वाढ 

    • विषाणू: जीवाणू/प्रोटोझोआ/इतर सूक्ष्मजीव यांच्या संख्येचे नियमन हे परिसंस्थांसाठी असलेले महत्व, जनुके एका सजीवांमधून दुसरीकडे प्रसार करण्याची प्रक्रिया, मानव/इतर प्राणी यांच्यामध्ये रोगप्रसार करणारे 

  • एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा (उदा. एक राज्य) प्राचीन व आधुनिक इतिहास व त्याचा प्रदेशातील परिसंस्था, संसाधने, व अर्थव्यवस्था यांच्याशी असलेला संबंध:

    • पर्यावरणीय इतिहास 

    • जैवविविधता 

    • शेती 

    • जमीनवापर, संसाधन वापर, संसाधन शोषण 

    • वेगेवेगळ्या संस्कृती  व समाज यांच्यातील संघर्षांचा वरील इतिहासाशी असलेला संबंध 

    • आर्थिक प्रारूपे: व्यापाराची वाढ (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) 

    • सामाजिक इतिहास उदा. व्यवसाय, शेतीतील उत्पन्नाचे वेगवेगळ्या समूहात/स्तरात वितरण, त्याचा अर्थव्यवस्था व  जैवविविधता यांच्याशी संबंध 

    • राजकीय संघर्ष, नैसर्गिक संसाधनांची मालकी, आणि व्यापाराची मालकी यांच्यातले आंतरसंबंध. उदा. वनाच्छादित जमीन, सुपीक जमीन, नद्या, तलाव, सागर किनारे 

    • लष्करी सामर्थ्याचे व लष्करी संघर्षाचे महत्व 

    • लष्कराची नैसर्गिक संसाधनांची गरज: पाणी, लाकूडफाटा, धातू,  नौकानिर्मितीसाठी लागणारे लाकूड, लष्करी वाहतुकीसाठी गुरेढोरे, अन्नाची गरज 

    • शेती व लष्कर यांच्या तंत्रज्ञान वापरातील बदल 

    • शेतसारा, इतर कर व्यवस्था 

    • शेती, राजकीय सत्ता, व लष्करी सत्ता यांच्यामुळे  झालेले सामाजिक स्तरीकरण 

    • औद्योगिकीकरण: त्यामुळे स्थानिक संस्कृतीत होणारे आर्थिक व सामाजिक बदल 

 

इतिहास, भूगोल, आणि विज्ञान यातील या इयत्तेस अनुरूप इतर अनेक संकल्पना समांतरपणे घेतल्या जाव्यातच. खाली अशा संकल्पनांची एक प्रातिनिधिक यादी दिली आहे (ही संपूर्ण यादी नाही)

  • पृथ्वीचे परिवलन - अक्षवृत्तांवरील दिवस, स्थानिक वेळ यांचे बदल 

  • पृथ्वीची अंतर्रचना: कवच, मध्यावरण, बाह्यगाभा, अंतर्गाभा 

  • मानवी आरोग्य: संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, इतर प्राण्यांवरील विषाणू मानवात पसरून होणारे रोग, हवामान बदलामुळे ध्रुवीय बर्फ व शीतकवच वितळल्यामुळे प्राचीन जीवजंतू मुक्त झाल्याने होणारे संभाव्य रोग 

  • पेशीचा सविस्तर अभ्यास: पेशीचे भाग व रचना, त्यांचे कार्य, पेशीतील ऊर्जानिर्मिती व वापर, परासरण 

  • मानवी श्वसन व रक्ताभिसरण संस्थांचा सविस्तर अभ्यास 

bottom of page