top of page
पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता सातवी

योगेश पाठक 

आधी सांगितल्याप्रमाणे, बारा वर्षाची मुले नवीन विषय-घटना-प्रारूपे यांचा अभ्यास करत असतात. तर्काधारित, वस्तुनिष्ठ विश्लेषण ती आता जास्त चांगली करू शकतात. हे त्यांच्या शिक्षणप्रक्रियेत दिसून येतं. यावर्षी संकल्पनांचा मोठा आवाका  घेऊन त्या संकल्पनांचे एकत्रीकरण, संकलन करायचा प्रयत्न करावा. ‘किशोरावस्थेआधीची एक प्रगल्भता’ त्यांना आलेली असते. तिचे प्रतिबिंब शैक्षणिक साहित्यातही पडलेले दिसावे. 

 

इकोयूनिव्हच्या ‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना सातवीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.

 • या वर्षी निसर्गाचा इतिहास पुन्हा खोलात जाऊन अभ्यासता येईल. 

  • भूशास्त्र 

  • प्राचीन काळातील खंड व त्यांची हालचाल 

  • जीवन आणि जैवविविधता यांच्या इतिहासातील महत्वाचे टप्पे 

  • प्राचीन काळातील प्रजाती नामशेष होण्याचे कालखंड व त्याची कारणे 

 • उत्क्रांती सिद्धांत, त्याचा इतिहास, पुरावा (उदा. अनुकूलन) 

  • डार्विनचे कार्य, त्याचे सिद्धांत 

  • सिद्धांत सिद्ध करणारा शास्त्रीय पुरावा 

  • उत्क्रांती सिद्धांतात आधुनिक विज्ञानाने टाकलेली भर व सुधारणा 

 • समुद्र (पुढे चालू)

  • भरती व ओहोटी यांची निर्मिती 

  • भांगाची व उधाणाची भरती 

  • भरती-ओहोटीचे वेळापत्रक: स्थानिक उदाहरणे 

  • समुद्री व किनाऱ्यावरील परिसंस्थांसाठी असलेले भरती-ओहोटीचे महत्व 

  • लाटांची निर्मिती, त्यांच्यातील ऊर्जा, व त्यामुळे होणारे किनाऱ्याचे क्षरण 

  • त्सुनामी 

 • वातावरण (पुढे चालू) 

  • वातावरणीय दाब 

  • पृथ्वीवरील दाबाचे पट्टे 

  • पृथ्वीवरील वारे आणि त्यांचे समुद्र, भूशास्त्र, आणि जमीन व समुद्रावरील परिसंस्था यांच्याशी अनोन्यसंबंध - मोसमी वारे, वादळे, चक्रीवादळे

  • वाऱ्यांचे सजीवांच्या जीवनप्रक्रियांसाठी महत्व: उदा. पक्ष्यांचे स्थलांतर 

 • ऋतूंची निर्मिती व वार्षिक वेळापत्रक 

 • पृथ्वीवरील महत्वाच्या परिसंस्था 

  • जैवभौगोलिक प्रदेश, स्थानिक जैवविविधता (अनुकूलन: खाली पहा)

  • जैवभौगोलिक प्रदेशांमध्ये ऋतूंनुसार होणारे बदल - परिसंस्थेचे रूप, वनस्पती व प्राणी यांचे जीवनचक्रे 

  • जैवभौगोलिक प्रदेशांमधील मानवी जीवन: अन्न, वस्त्र, निवारा, पिके, नैसर्गिक संसाधनांचा वापर, ऋतूंप्रमाणे जीवनशैलीत होणारे बदल 

 • पाण्याचा अभ्यास (पुढे चालू)

  • मागील इयत्तांमधील उजळणी 

  •  पाण्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म: बाष्पीभवन, उत्कलन, सांद्रीभवन, गोठणे, क्षारता, द्रावकता, असंगत वर्तन, सामू

  • पाण्याचे विशेषत्व, त्याचे  पृथीवरील नैसर्गिक इतिहासातील महत्व 

  • पृथीवरील पाण्याची रूपे 

  • जलप्रदूषण 

  •  जलव्यवस्थापन व जलपुनर्भरण 

 • मृदेचा अभ्यास (पुढे चालू)

  • मागील इयत्तांमधील उजळणी 

  • वारे व नद्या यामुळे होणारे मृदेचे वहन 

  • शेतीच्या दृष्टीकोनातून मृदा 

  • समृद्ध परिसंस्थेच्या दृष्टीकोनातून मृदा 

  • मृदेचे प्रकार (प्राथमिक - स्थानिक/राज्यातील)

  • मृदेचे गुणधर्म (पोत, सामू, विद्युतवाहकता) 

  • मृदाप्रदूषण, मृदेची चाचणी 

  • मृदसंवर्धनाच्या पद्धती - प्राथमिक 

 • वनस्पती व प्राणी यांच्या वर्गीकरणाचे शास्त्र - औपचारिक सुरुवात 

  • स्थानिक भागातील प्रजाती 

  • जिल्हा, राज्य, देश, प्रादेशिक परिसंस्था/जैवभौगोलिक प्रदेश यांच्यामधील प्रजातींची झलक व त्यांचे वर्गीकरण 

  • शास्त्रीय पद्धतीने केलेल्या वर्गीकरणाचे फायदे 

  • स्थानिक नावांचा उपयोग 

  • लिनियसची वर्गीकरण पद्धत 

 • मानव, सस्तन प्राणी, आणि पक्षी यांच्यातील काही शरीरसंस्था (उदा. रक्ताभिसरण, श्रवण, पचन व अन्न, स्नायू, चेता) 

  • प्राण्यांमधील पोषणाचे प्रकार: समभक्षी, मृतोपजीवी, परजीवी 

  • शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी प्राणी 

 • वनस्पती 

  • रचना: मूळ, खोड, पान, फूल, आणि फळ यांची रचना 

  • रचना व वर्गीकरण यांच्यातील संबंध 

  • प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वयंपोषी पोषण 

  • पोषकद्रव्यांचे वहन 

  • नायट्रोजनचे स्थिरीकरण 

  • वनस्पतींमधील इतर प्रकारचे पोषण: सहयोगी, परपोषी, कीटकभक्षी, मृतोपजीवी 

 • अनुकूलन 

  • वाळवंटातील वनस्पती व प्राणी 

  • समशीतोष्ण व ध्रुवीय प्रदेशातील वनस्पती व प्राणी 

  • वन परिसंस्थांतील वनस्पती व प्राणी 

  • गवताळ परिसंस्थांतील वनस्पती व प्राणी 

  • पाण्यातील वनस्पती व प्राणी 

  • अन्नभक्षण व पचन यासाठी झालेले अनुकूलन 

 • प्राणी/वनस्पती यांची शरीररचना व विद्युत यांचा संबंध: साधारण वाहकता, विद्युत सर्पाकृती माश्याचे उदाहरण 

 • वनस्पती, प्राणी, आणि मानव यांच्यातील समतोल व नियंत्रण साधणाऱ्या प्रक्रिया व भाग 

 • सूक्ष्मजीवशास्त्र: औपचारिक ओळख 

  • पेशी: रचना, निरीक्षण, मापन, आकार - प्राथमिक 

  • परिसंस्था व अन्नसाखळ्या यांच्या दृष्टिकोनातून पेशी 

  • प्राणी-सूक्ष्मजीव संबंध 

  • वनस्पती-सूक्ष्मजीव संबंध 

  • मानव-सूक्ष्मजीव संबंध: उपयोगी सूक्ष्मजीव उदा. आतड्यातील जीवाणू, किण्वन व त्याचे उपयोग 

  • जीवाणू व विषाणू यामुळे मानवास होणारे रोग 

  • नैसर्गिक परिसंस्थांतींल मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे जीवाणू/विषाणू-मानव यांच्यातील वाढणारा संबंध व त्यातील धोके 

 • नैसर्गिक संसाधने आणि माणूस: तोंडओळख 

  • अन्नसंकलक मानव आणि परिसरातील नैसर्गिक संसाधने 

  • शेतकरी आणि परिसरातील नैसर्गिक संसाधने 

  • पशुपालक आणि परिसरातील नैसर्गिक संसाधने 

  • औद्योगिक मानव आणि नैसर्गिक संसाधने: समुद्र व जमीन यांच्यामधील संसाधने. उदा. खनिजे, खनिज तेल व नैसर्गिक वायू, 

  • जैविक व अजैविक संसाधनांच्या अतिशोषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या 

 • एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा (उदा. आपले राज्य) प्राचीन व आधुनिक काळातील इतिहास आणि त्याचा तेथील परिसंस्था, संसाधने, व अर्थकारण यांच्याशी संबंध: तोंडओळख 

  • परिसंस्थांचा इतिहास 

  • जैवविविधता 

  • शेती, जमीनवापर, संसाधनांचा वापर व शोषण 

  • वरील सर्वांचा राजनैतिक व सांस्कृतिक संघर्षाशी संबंध 

  • आर्थिक प्रारूपे - उद्योग-व्यापाराची वाढ - स्थानिक/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय 

  • सामाजिक इतिहास: व्यवसाय, शेतीतील उत्पन्नाचे समाजात वितरण, त्यांचा अर्थकारण  व जैवविविधता यांच्याशी संबंध 

  • नैसर्गिक संसाधनांची मालकी, व्यापारावरील वर्चस्व, व राजनैतिक संघर्ष यांचा संबंध. नैसर्गिक संसाधने म्हणजे वने, सुपीक जमीन, नद्या, तळी, समुद्रकिनारे व बंदरे इत्यादी

  • लष्करी बळाचा प्रभाव 

  • लष्कराच्या गरजांसाठी नैसर्गिक साधने उदा. पाणी, सरपण, नौकाबांधणीसाठी योग्य असे लाकूड, लष्करासाठी हत्ती/घोडे असे प्राणी, वाहतुकीसाठी घोडे/खेचर असे प्राणी, लष्कराची अन्नधान्याची गरज 

  • शेतीतील तात्कालिक तंत्रज्ञान, लष्करातील तंत्रज्ञान 

  • शेतसारा व इतर कर 

  • शेती, राजसत्ता, व लष्कर यामुळे तयार झालेले सामाजिक स्तर व वर्ग 

 • शेती  (पुढे चालू)

  • मागील इयत्तांमधील उजळणी 

  • मांस, अंडी, मासे, मध, रेशीम, फुले, यांच्या उत्पादनासाठी शेती. रोपवाटिका 

  • शेतमालाचे वितरण, किंमत, विपणन. दलाल, कंपन्या, व सरकार यांची भूमिका 

  • आधुनिक कृषी अर्थकारण - तोंडओळख 

  • आधुनिक शेतीच्या पद्धती - तोंडओळख 

  • शेतीचे तंत्रज्ञान, बियाणे, रासायनिक खते, ऊर्जेचा वापर - स्थानिक शेती, राष्ट्रीय शेती (तोंडओळख), जागतिक शेती (तोंडओळख) यांच्या परिप्रेक्ष्यात.  

 • मानवी वस्त्या-वसाहती 

  • अन्नसंकलक-शिकारी, पशुपालक, व शेतीच्या सुरुवातीच्या युगातील मानवी वस्त्या: छोट्या वाड्या-पाडे  व त्याभोवती शेतजमीन 

  • नदीकाठावर शेतीच्या आधारे वाढलेल्या प्राचीन संस्कृतींमधील (उदा. हराप्पा) दाट वस्त्या: गृहरचना, सार्वजनिक जागा (उदा. नहाणीघरे), धान्यकोठ्या, जल व्यवस्थापन, व्यापारासाठी उत्पादन (उदा. मण्यांचे) करणाऱ्या कार्यशाळा, व्यापारासाठी बंदरे 

  • आधुनिक शहरात होणारा तंत्रज्ञान व ऊर्जा यांचा वापर - तोंडओळख 

  • आधुनिक शहरातील आर्थिक प्रक्रिया व संधी - तोंडओळख 

  • आधुनिक शहर व ग्रामीण खेडे यांच्यातील फरक - तंत्रज्ञान, संसाधने, संधी, व आरामदायक सुविधा यांमध्ये - व त्यामुळे होणारे स्थलांतर 

  • आधुनिक वस्त्यांमधील कचरा व प्रदूषण 

 • नकाशा काढण्याच्या पद्धती (पुढे चालू): भूरूपे, समोच्च रेषा, समोच्च नकाशा, शेती, जाळी (रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी वहन), वस्त्या, जमीनवापरातील बदल 

 • आपल्या देशाचे संविधान 

  • संविधानाचा गाभा व मुख्य मुद्दे 

  • त्याचे आपल्या जीवनातील स्थान 

  • संविधान व देशातील निसर्गाचा इतिहास, निसर्ग-माणूस संबंधांचा इतिहास, संसाधन वापराचा इतिहास 

  • नागरिकांची निसर्गाप्रती संविधानिक कर्तव्ये व दैनंदिन जबाबदाऱ्या 

 • आपल्या देशाचा कारभार / शासन 

  • कार्यकारी शाखा: केंद्र, राज्य, व स्थानिक प्रशासन

  • न्याय शाखा 

  • संविधान व घटना यात लिहिलेले निसर्गाचे संरक्षण व संवर्धन याबद्दलचे मुद्दे, त्याबद्दल केले गेलेले मुख्य कायदे 

  • निसर्ग व नैसर्गिक संसाधने यांच्या रक्षणाप्रती कार्यकारी शाखेच्या जबाबदाऱ्या 

  • निसर्ग व नैसर्गिक संसाधने यांच्या रक्षणाप्रती न्याय शाखेच्या जबाबदाऱ्या 

 

इतिहास, भूगोल, आणि विज्ञान यातील या इयत्तेस अनुरूप इतर अनेक संकल्पना समांतरपणे घेतल्या जाव्यातच. खाली अशा संकल्पनांची एक प्रातिनिधिक यादी दिली आहे (ही संपूर्ण यादी नाही)

 • प्राणी व वनस्पतींच्या शरीराची श्रेणीबद्ध रचना: पेशी-उती-इंद्रिये-संस्था 

 • सजीवांतील पुनरुत्पादन व त्याच्या वेगवेगळ्या पद्धती 

 • ऊर्जेची रूपे: विद्युत, उष्णता, ध्वनी, चुंबकत्व 

 • पदार्थांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म 

 • भौतिक बदल व रासायनिक बदल 

bottom of page