पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता पाचवी
योगेश पाठक
दहा वर्षाच्या मुलांना स्वतःबद्दल आणि सभोवतालच्या समाजाबद्दल नव्याने जी जाणीव होत असते, तिच्याशी निसर्ग-मानव संबंधांचे शिक्षणही जोडले जावे.
या वयात मुलांना विज्ञानशाखांची अतिशय प्राथमिक पण औपचारिक ओळख होत असते. उदा. भूशास्त्र, अवकाशशास्त्र, कदाचित पारिस्थितिकीसुद्धा. या शाखांमधील संकल्पनाही निसर्गशिक्षणातच अंतर्भूत कराव्यात.
इकोयूनिव्हच्या ‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना पाचवीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.
-
तिसरीतील ‘उत्क्रांतीच्या गोष्टी’ची उजळणी व्हावी. त्यात खालील नवीन संकल्पनांची भर पडावी.
-
पृथ्वी व चंद्र कसे तयार झाले
-
पृथ्वीवर सजीव सृष्टी सुरु झाल्यावरचे महत्वाचे कालखंड: त्या प्रत्येक काळातील सजीव सृष्टी - एकपेशीय/बहुपेशीय सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी
-
चौथीत शिकलेले ‘प्राण्यांचे वर्ग’ उत्क्रांतीच्या परिप्रेक्ष्यातून पाहणे
-
डार्विन आणि वॉलेस यांचे काम व सिद्धांत: तोंडओळख
-
माणसाची उत्क्रांती: आपल्या कुळाच्या जवळ असणारे कपीवर्ग व आदिमानवसदृश पूर्वज
-
-
तिसरीतील ‘निसर्ग-माणूस संबंधांच्या गोष्टी’ची उजळणी व्हावी. त्यात खालील नवीन संकल्पनांची भर पडावी.
-
अश्मयुग: त्याचे तीन कालखंड व त्या प्रत्येकात वापरली गेलेली हत्यारे-अवजारे
-
वरील तिन्ही कालखंडातील मानवी वस्त्या
-
अन्नसंकलक मानवाकडून आपला शेतकरी, धनगर, आणि आजचा औद्योगिक मानव होण्याकडे झालेला प्रवास (इयत्ता तिसरी): उजळणी
-
ताम्रयुग, कास्ययुग
-
लोहयुग
-
कृषिप्रधान वसाहतींमधील सुरुवातीची अवजारे
-
कृषिप्रधान वसाहतींमधील सुरुवातीची कौशल्ये
-
कृषिप्रधान वसाहतींमधील सुरुवातीची घरे व वस्त्या
-
मोठ्या नद्यांच्या काठी वसलेल्या प्राचीन संस्कृती: लिपी, चिन्हे, शिक्के, विनिमय-व्यापाराच्या वस्तू, वसाहतीचा नकाशा, सापडलेल्या पुराणवस्तू
-
उद्योगप्रधान समाज: औद्योगिक क्रांती ते १९५०: तंत्रज्ञान, द्रव्य व ऊर्जा वापर: तोंडओळख
-
उद्योगप्रधान समाज: १९५० ते आत्ता : तंत्रज्ञान, द्रव्य व ऊर्जा वापर: तोंडओळख
-
-
अधिवास व परिसंस्था: मुख्य वैशिष्ट्ये
-
जैवभौगोलिक प्रदेश: संकल्पना, उदाहरणे
-
पृथीवरील शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण: तोंडओळख
-
अनेक अन्नसाखळ्यांची/अन्नजाळ्यांची उदाहरणे, वनस्पती-प्राण्यांचे परस्परावलंबन
-
परिसंस्थेतील साधने सजीव कशी वाटून घेतात?
-
हवामानाचा परिसंस्थेवर कसा परिणाम होतो?
-
भूशास्त्र: भूरूपांची ओळख, पृथ्वीच्या रचनेतील वेगवेगळे थर
-
नकाशा काढण्याची तंत्रे. उदा. समुद्रसपाटीपासून उंची दाखविण्याच्या पद्धती, जमीनवापर, नद्यांचे पात्र, मानवनिर्मित जाळी (उदा. रेल्वे व रस्ते), महत्वाची संसाधने, नकाशातील प्रमाण, नकाशातील वेगवेगळी चिन्हे
-
भूरूपांचा परिसंस्थेवर कसा परिणाम होतो?
-
मानवाचे अन्न:
-
उजळणी: शेतीची आत्ताची पद्धत, धान्यांची-बियाण्यांची विविधता, अन्नपदार्थांची विविधता, देशातील वेगवेगळ्या राज्यात असलेली पिके
-
शेतीचे एकंदर प्रमाण व शेतीखालील जमीन
-
शेतीचे तंत्रज्ञान
-
पीक व अन्न यांच्यातून द्रव्य व ऊर्जा यांचे चक्र
-
या सर्वाचा निसर्गावरील परिणाम.
-
याची भूतकाळाशी तुलना.
-
-
मानवी वस्त्रे:
-
उजळणी: सध्याचा कच्चा माल व निर्मितीची पद्धत, ऋतू, प्रदेश, समाज-चालीरीती यानुसार कपड्यांची विविधता, कच्च्या मालाची व निर्मितीप्रक्रियांची विविधता.
-
वस्त्र निर्मितीचे एकंदर प्रमाण.
-
वस्त्रासाठी द्रव्य व ऊर्जा यांचे चक्र.
-
या सर्वाचा निसर्गावरील परिणाम. याची भूतकाळाशी तुलना.
-
कपडे धुण्याची प्रक्रिया व साबण - आत्ताची व भूतकाळातील.
-
निसर्गावरील परिणाम.
-
-
मानवी पाणीवापर:
-
उजळणी: आत्ताचे पाणी मिळविण्याचे वेगवेगळे मार्ग. त्यांची विविधता. एकंदर प्रमाण. पाण्याचे मानवी जीवनातील चक्र.
-
तंत्रज्ञान: साठवण, शुद्धीकरण, वितरण
-
ऊर्जावापर
-
निसर्गावरील परिणाम
-
निसर्गस्नेही पाणीवापर
-
भूतकाळातील जलव्यवस्थापनाशी तुलना.
-
-
मानवी घरांचे बांधकाम, कार्यालयीन इमारती, इतर सर्व लोकोपयोगी इमारतींचे बांधकाम:
-
उजळणी: बांधकामाचे आत्ताचे प्रमाण व विविधता, कच्चा माल, द्रव्यांचे जीवनचक्र
-
निर्मिती प्रक्रिया व तंत्रज्ञान
-
ऊर्जा वापर
-
निसर्गावरील परिणाम
-
जमीन वापरावरील परिणाम
-
निसर्गस्नेही बांधकामाची उदाहरणे.
-
शहर व ग्रामीण भाग, विशेषतः आदिवासी भाग यांच्यातील बांधकाम प्रक्रियेतील फरक.
-
भूतकाळातील निसर्गस्नेही बांधकामे.
-
द्रव्यांचे चक्रीकरण
-
-
मानवनिर्मित जाळी: तोंडओळख, त्यांचा द्रव्य व ऊर्जावापर, सामायिक संसाधनांवरील परिणाम, जमीन वापरावरील परिणाम
-
वाहतुकीची जाळी: रस्ते, रेल्वे, विमानवाहतूक, जलवाहतूक
-
सिंचनाचे जाळे, नागरी भागातील पाणीपुरवठा जाळे
-
सांडपाणी वाहून नेणारे जाळे, कचऱ्याची व्यवस्था, कचरा साठविणे
-
-
औद्योगिक प्रक्रिया: तोंडओळख, द्रव्य व ऊर्जा वापरावरही परिणाम
-
आपला देश आणि त्यातील मुख्य नैसर्गिक प्रदेश/परिसंस्था
-
आपल्या देशातील नैसर्गिक प्रदेश/परिसंस्था यांचे विविधता (उदा. नद्या, वने, वाळवंटे, पर्वत/डोंगररांगा)
-
विशिष्ठ अधिवासातील स्थानिक प्रजाती - वने: उदाहरणे
-
विशिष्ठ अधिवासातील स्थानिक प्रजाती - नद्या व जलमय भूमी : उदाहरणे
-
विशिष्ठ अधिवासातील स्थानिक प्रजाती - गवताळ प्रदेश : उदाहरणे
-
विशिष्ठ अधिवासातील स्थानिक प्रजाती - वाळवंट : उदाहरणे
-
विशिष्ठ अधिवासातील स्थानिक प्रजाती - समुद्र : उदाहरणे
-
नैसर्गिक प्रदेश नकाशात काढणे: प्राकृतिक नकाशा
-
परिसंस्था नकाशात काढणे: उदा. वन किंवा नदी
-
-
मानवांस मिळणाऱ्या नैसर्गिक संसाधनातील असमानता: तोंडओळख
-
विशिष्ठ स्थानिक किंवा प्रादेशिक परिसंस्थांवर होणार मानवाचा परिणाम: उदाहरणे
-
आपल्या देशापुढील पर्यावरणीय आव्हाने (जागतिक आव्हाने पुढील इयत्तांमध्ये): तोंडओळख
-
कचरा
-
प्रदूषण
-
जमीनवापरातील बदल
-
अधिवासांचा नाश
-
प्रजातींचे नामशेष होणे
-
जागतिक तापमानवाढ
-
हवामानबदल
-
वरील आव्हाने सोडून इतर आव्हाने (उदा. आर्थिक विषमता व तिचा पर्यावरणाशी अनोन्यसंबंध) पुढील इयत्तांमध्ये असावीत
-
-
संकीर्ण चर्चा: पृथ्वी हा विश्वातील एक विशेष ग्रह आहे, कारण इथे जीवन आहे. जीवनाला निरंतर जगता येईल अशी विशेष परिस्थिती इथे आहे. ज्यांच्यावर जीवन आहे असे इतर ग्रह अजूनही सापडलेले नाहीत. तर आपली जबाबदारी काय असली पाहिजे?
-
पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मानव करत असलेले प्रयत्न
-
अभयारण्ये व इतर संरक्षित विभाग
-
प्रदूषणाचे मापन व नियंत्रण
-
कचरा गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे व त्याचा पुनर्वापर
-
स्थानिक/राज्य/केंद्र सरकारातील पर्यावरणीय संस्था
-
आदिवासी व ग्रामीण समाजांतील पर्यावरण रक्षणाच्या पद्धती व नियम: उदा. देवराया
-
वरील संकल्पनांव्यतिरिक्त इतर काही संबंधित संकल्पना विज्ञान/इतिहास/भूगोल या पाठ्यपुस्तकात असतील, तर त्याही शिकविल्या जाव्यात.