पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता चौथी
योगेश पाठक
आधी सांगितल्याप्रमाणे, चौथ्या इयत्तेच्या वर्षी, निसर्गशिक्षण प्रक्रियेचा भर निसर्गविज्ञानाची तोंडओळख करून घेण्यावर असावा.
या इयत्तेत मुलांना कदाचित विज्ञान किंवा पर्यावरण यांची स्वतंत्र पाठयपुस्तकेही असतील, पण त्यात बहुधा मानवी परिप्रेक्ष्य जास्त येत असेल.
‘पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे’ निसर्गास (मानवास नव्हे) केंद्रस्थानी ठेवते. त्याच अनुषंगाने खालील संकल्पना शिकल्या जाव्यात.
याव्यतिरिक्त इतर काही संकल्पना इतर पाठ्यपुस्तकात असतील, तर त्याही वेगळ्या शिकविता येतील.
‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना चौथीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.
-
वनस्पती व प्राणी यांचे एकंदर निरीक्षण व अभ्यास कसा करावा याची ओळख. त्यांची शरीररचना, गती, अन्न, अधिवास, परिसंस्था, जीवनचक्र, ऋतूंनुसार बदल, स्थलांतर, प्रजनन, मुलांचे संगोपन, उत्क्रांतीचे झाड व जैवविविधतेचे जाळे यात हा सजीव नक्की कुठे आहे, इत्यादी.
-
वनस्पतींचे वर्ग : तोंडओळख
-
प्राण्यांचे वर्ग : तोंडओळख
-
वनस्पतींचे समूह: तोंडओळख
-
प्राण्यांचे समूह: तोंडओळख
-
सविस्तर निरीक्षण: वनस्पती - मोठे वृक्ष
-
सविस्तर निरीक्षण: वनस्पती - लहान वृक्ष
-
सविस्तर निरीक्षण: वनस्पती - झुडपे
-
सविस्तर निरीक्षण: वनस्पती - लहान रोपटी
-
सविस्तर निरीक्षण: वनस्पती - वेल
-
सविस्तर निरीक्षण: प्राणी - सस्तन
-
सविस्तर निरीक्षण: प्राणी - मासे
-
सविस्तर निरीक्षण: प्राणी - कीटक
-
सविस्तर निरीक्षण: प्राणी - पक्षी
-
सविस्तर निरीक्षण: प्राणी - कृमी
-
सविस्तर निरीक्षण: प्राणी - उभयचर
-
सामाजिकरीत्या जगणारे प्राणी व त्यांचे वर्तन: मधमाश्या, मुंग्या
-
नैसर्गिक परिसंस्था राज्य व राज्यातील प्रदेश यांच्या नकाशात काढणे (उदा. नद्या, वने, गवताळ प्रदेश, जलमय भूमी)
-
एका विशिष्ट स्थानावरील नैसर्गिक परिसंस्था व मानव यांचा संबंध समजून घेणे: मानवी जीवन, जमिनीचा वापर, शेती, अर्थव्यवस्था, निसर्गकेंद्री व्यवसाय
-
सजीव व निर्जीव वस्तू
-
सजीव आणि निर्जीव गोष्टींचा माणसाने आपल्या जीवनप्रक्रियेसाठी कसा-कसा वापर केला आहे व त्यामुळे निसर्गात काही असमतोल तयार झाला आहे का? तोंडओळख
-
मानवाचे अन्न:
-
शेतीची आत्ताची पद्धत
-
धान्यांची-बियाण्यांची विविधता
-
अन्नपदार्थांची विविधता
-
देशातील वेगवेगळ्या राज्यात असलेली पिके
-
-
मानवी वस्त्रे:
-
सध्याचा कच्चा माल व निर्मितीची पद्धत.
-
ऋतू, प्रदेश, समाज-चालीरीती यानुसार कपड्यांची विविधता.
-
कच्च्या मालाची व निर्मितीप्रक्रियांची विविधता.
-
-
मानवी पाणीवापर:
-
आत्ताचे पाणी मिळविण्याचे वेगवेगळे मार्ग.
-
त्यांची विविधता.
-
एकंदर प्रमाण.
-
पाण्याचे मानवी जीवनातील चक्र
-
-
मानवी घरांचे बांधकाम, कार्यालयीन इमारत, इतर सर्व लोकोपयोगी इमारतींचे बांधकाम:
-
बांधकामाचे आत्ताचे प्रमाण व विविधता
-
कच्चा माल
-
द्रव्यांचे जीवनचक्र
-
-
मानवी शरीराची आंतररचना: तोंडओळख
-
पक्षी व सस्तन प्राणी यांच्या शरीराची आंतररचना: तोंडओळख
-
प्रथमोपचार: मानवांवर
-
प्रथमोपचार: जखमी पक्षी व सस्तन प्राण्यावर (पाळीव व जंगलातील)
-
मानवी संस्कृती व लोकसंख्या वाढ यामुळे जमीनवापरात होणारा बदल: तोंडओळख
-
नैसर्गिक आपत्ती: स्वरूप व मानवी वसाहती, झाडे, व प्राण्यांचे अधिवास यांच्यावर होणारा परिणाम
-
संकीर्ण चर्चा: निसर्ग, जल व मृदा यांचे संवर्धन, अधिवासांचे रक्षण