top of page
पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता तिसरी

योगेश पाठक 

 

आधी सांगितल्याप्रमाणे आठ वर्षाच्या, म्हणजे तिसरीतल्या मुलांना मोठ्या गोष्टींच्या स्वरूपात दोन विषय समजावून देता येतील: १. निसर्गाचा इतिहास आणि २. निसर्ग-माणूस संबंधांचा इतिहास. 

उत्क्रांती, जैवविविधता आणि पृथ्वीवरील निसर्गाचा इतिहास यात खालील संकल्पना यायला हव्यात: 

  • आपली सूर्यमाला आणि पृथ्वी किती जुनी आहे? पृथ्वीवर जीवन सुरु व्हायच्या आधी पृथ्वी  कशी होती? 

  • पृथ्वीवर सजीव सृष्टी कशी सुरु झाली असेल यासंबंधीचे अंदाज/अनुमान 

  • पृथ्वीवर सजीव सृष्टी सुरु झाल्यावरचे महत्वाचे कालखंड: त्या प्रत्येक काळातील सजीव सृष्टी - एकपेशीय/बहुपेशीय सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी 

  • उत्क्रांती: प्राथमिक ओळख 

  • जीवाश्मे व त्यांची विविधता 

  • पक्ष्यांची उत्क्रांती - सविस्तर उदाहरण 

  • नैसर्गिकरीत्या एखाद्या प्रजातीचे नामशेष होणे. उदा. डायनोसॉर

  • माणसाची उत्क्रांती 

  • माणसाच्या निसर्गातील फेरफारामुळे एखाद्या प्रजातीचे नामशेष होणे -  उदाहरणे. 

 

निसर्ग-माणूस संबंधांचा इतिहास तसेच मानवी संस्कृतीची कहाणी सांगताना खालील संकल्पनांचा अंतर्भाव व्हावा. 

  • उत्क्रांतीच्या ‘झाडा’वर मानवप्राण्याची शाखा सुरु झाल्यावर आपण फक्त शिकारी-अन्नसंकलक असेपर्यंतचा प्रवास 

    • मानवप्राण्यांमधील परस्पर-सहकार्य, गटाने राहणे,अन्न मिळविणे 

    • इतर मानवसदृश प्रजातींबरोबर पृथ्वीवरील आपले सह-अस्तित्व (उदा. निएंडरथल - शक्तिमान मानव)

    • मानवांचे सुरुवातीचे अन्न - मांस, कंदमुळे,फळे-पाने  इत्यादी 

    • भाषा 

    • मानवांच्या टोळ्या 

    • हत्यारे: पाषाणयुग. दगड व प्राण्यांची हाडे यांपासून बनविलेल्या हत्यार-अवजारांचे वैविध्य 

    • अग्नीचा शोध आणि त्याचे उपयोग 

    • वसाहती, जलस्रोतांचा उपयोग

    • अन्नावरील प्रक्रिया: चिरणे, भाजणे, शिजविणे इत्यादी 

    • साधी यंत्रे/बांधकाम: उदा. तरफ, पायऱ्या, पूल, झोपडी 

    • वसाहतींसाठी लागणारी जमीन, सरपणासाठी लागणारे लाकूड यांचा जंगलावरील परिणाम 

    • माणसाने केलेल्या शिकारीचा छोटे-मोठे सस्तन प्राणी, पक्षी यांच्यावर झालेला परिणाम 

    • कला. उदा. प्राचीन गुहांमध्ये असलेली भित्तीचित्रे 

    • या प्रवासाचा पुरावा म्हणून सापडलेले अवशेष, जीवाश्म, इत्यादी

    • मानवाचे पृथ्वीवरील स्थलांतर (आफ्रिकेतून सुरुवात व इतरत्र) 

    • सुरुवातीच्या टोळ्यांमधील मिथके, समज, निसर्गास दिलेले देवत्व, इत्यादी 

  • अन्नसंकलक मानवाकडून आपला शेतकरी, धनगर, आणि आजचा औद्योगिक मानव होण्याकडे झालेला प्रवास सांगताना खालील संकल्पनांचा अंतर्भाव व्हावा.

    • प्राणी पाळण्याची सुरुवात  / शेळ्यामेंढ्या व गुरे राखण्याची सुरुवात 

    • शेतीची सुरुवात

    • सुरुवातीची खेडी, तुलनेने जास्त लोकसंख्या असलेली ‘शहरे’

    • छोटे स्थानिक समाज / कुळे/ टोळ्या / जमाती - त्यांचे रीतिरिवाज 

    • त्यांच्यामधील व्यापार 

    • विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय 

    • समाजातील वर्ग  

    • कुंभारकाम व मातीची भांडी, त्यातील वैविध्य 

    • सुरुवातीची घरे 

    • धर्म व संस्कृती यांची सुरुवात 

    • स्थानिक टोळीचे नायक,  पुढारी,सरदार-राजघराणे यांची सुरुवात 

    • कलेची प्रगती: रंगकाम केलेली भांडी, मण्यांचे दागिने, बाहुल्या/मूर्ती, शिक्के 

    • वस्तूंची देवघेव, चलन व्यवस्था व त्यावर आधारित व्यापार 

    • सुरुवातीची वैज्ञानिक प्रगती व तंत्रज्ञान, विशेषतः धातुकाम: तांबे, कास्य, लोह, सोने, चांदी यांचा वापर 

    • चाकाचा शोध व त्याचे वेगवेगळे उपयोग 

    • सुरुवातीची वाहने व प्रवास: जमिनीवर, नदी व समुद्रातून, बर्फावरून 

    • मोठ्या नद्यांच्या काठी वसलेल्या प्राचीन संस्कृती: प्राथमिक माहिती. शेती, जलव्यवस्थापन, व्यापार, यांची माहिती 

    • मध्ययुग व त्यात लष्करास आलेले महत्व (राजा व त्याचे साम्राज्य अबाधित रहावे यासाठी), त्याचा निसर्गावर होणारा  परिणाम. उदा. आरमारासाठी लाकूड, प्राण्यांची शिकार, सरपणासाठी जंगलतोड: प्राथमिक ओळख 

    • आधुनिक विज्ञान: मुख्य शोध 

    • आधुनिक औद्योगिक जीवन: वाफेवर आधारित यंत्रे, वीज, जेट इंजिने व विमाने, जागतिकीकरण, मोठया प्रमाणावर होणारे दळणवळण - प्रवास व वाहतूक, मानवनिर्मित वस्तूंमधले वैविध्य, ऊर्जावापर, संगणक: प्राथमिक माहिती व त्याचे निसर्गावर होणारे परिणाम - प्रदूषण, निसर्गाखालील जमिनीवर मानवी वापर सुरु होणे 

  • आधुनिक जगातही अन्नसंकलकाचे जीवन जगणाऱ्या जमाती, आदिवासी, व त्यांचे आणि शेतकरी/धनगर/औद्योगिक मानव या सर्वांचे सह-अस्तित्व

 

याबरोबरच तिसरीच्या वर्षात खालील संकल्पना अभ्यासक्रमात असाव्यात: 

  • स्थानिक परिसर, आपले खेडे/गाव, आपला तालुका व जिल्हा यांची भौगोलिक समज 

  • आपले खेडे/गाव, आपला तालुका व जिल्हा यांचा नकाशा समजून घेणे, त्याचे वर्णन करता येणे, नकाशात माहिती भरता येणे 

  • जिल्ह्यातील भौतिक, नैसर्गिक व हवामानाचे घटक आणि जगण्याचे-रोजगाराचे वेगवेगळे मार्ग, व्यवसाय, आणि सामाजिक-सांस्कृतिक आचार-विचार यांचा संबंध जोडता येणे 

  • परिसंस्थेची संकल्पना (प्राथमिक)

  • नैसर्गिक/पारिस्थितिकीय भूचित्राकडे परिसंस्थांचा समुच्चय म्हणून बघता येणे 

  • नैसर्गिक/पारिस्थितिकीय भूचित्र हे  गावाच्या / तालुकाच्या / जिल्ह्याच्या नकाशावर दाखविता येणे - ते नकाशातील  सीमारेषांशी बहुधा जुळत नसेल, तर ते जुळत का नाही हे समजून घेणे 

  • निसर्ग-माणूस संबंधांचा इतिहास आणि त्याचा जल, जंगल, जमीन यांच्याशी संबंध (उदा. नदी ही मानवी संस्कृतीपेक्षा प्राचीन असते, मानवी वस्ती नदीकाठाभोवती होत गेली). यात शक्य तेवढी स्थानिक उदाहरणे घेतली जावीत 

  •  १. निसर्गाची/उत्क्रांतीची कहाणी आणि २. माणसाची/मानव-निसर्ग संबंधांची कहाणी ही स्थानिक भाग/गाव/तालुका/जिल्हा यात कशी-कशी घडत गेली याच्या खुणा, उदाहरणे, पुरावे शोधणे.  

bottom of page