top of page
पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता दुसरी

योगेश पाठक 

 

दुसरीच्या वर्षात बालवाडीत आणि पहिलीत शिकलेल्या पर्यावरणीय संकल्पनांची उजळणी घेतली जावी. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडला जावा. 

याबरॊबरच इकोयूनिव्हच्या ‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना दुसरीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.

  • वारा कुठून येतो, कसा तयार होतो? आपल्या स्थानिक हवामानात कुठले वेगवेगळे वारे आहेत? (जागतिक वारे इ. गाळावे)? स्थानिक वारे ऋतूंनुसार कसे बदलतात? 

  • पाऊस कुठून येतो, कसा तयार होतो? कुठल्या ऋतूत पाऊस येतो, कधी येतो, कधी संपतो? केव्हा कमी, केव्हा जास्त असतो? वादळ म्हणजे काय? ते कसं येतं? 

  • नदीचा एकंदर प्रवास कसा असतो? ती कुठे जोरात वाहत असते? कुठे शांतपणे वाहत असते? नदीचे पात्र म्हणजे काय? धबधबे कसे तयार होतात? 

  • स्थानिक हवामानात बर्फ असेल, तर बर्फाबद्दलचे प्रश्न (पावसाप्रमाणेच) 

  • कीटक कसे धावतात, उडतात? त्यांचा वेग किती असतो, त्यांची चालण्याची, उडण्याची पद्धत कशी असते?

  • वरील प्रश्न: साप-सरडे, बेडूक, कासवे, स्थानिक पक्षी, स्थानिक सस्तन प्राणी 

  • प्राण्यांचे स्थलांतर (मुख्यतः पक्षी) 

  • निसर्गातील परस्परावलंबित्व. याची कमीतकमी २४ उदाहरणे देऊन निसर्गात किती विविध प्रकारचे परस्परावलंबित्व आहे ते दाखविण्यात यावे. 

  • प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा एखादा विशिष्ठ प्रकार/वर्ग अभ्यासणे म्हणजे नक्की काय? वर्गीकरण म्हणजे काय (प्राथमिक)?

  • निसर्गातून आपण वनस्पतींचे, प्राण्यांचे नमुने का गोळा करतो? त्यातून आपल्याला काय समजतं? 

  • स्थानिक भागात राहणारे आणि आपल्या देशातले (निवडक) निसर्ग अभ्यासक कोण आहेत? त्यांनी निसर्गात काय बघितले? काय गोळा केले? काय अभ्यासले? कशाचे वर्गीकरण केले? 

  • मासेमार समाज: ते नद्या/तळी/समुद्र यांच्यात मासे कसे पकडतात, मासे किनाऱ्यावर कसे आणतात, स्वच्छ कसे करतात, कसे वाळवतात, कुठे विकतात? 

  • जंगलातून फळे, पाने, फुले, भाज्या, डिंक  गोळा करून विकणाऱ्या लोकांबद्दल वरीलप्रमाणेच समजून घेणे 

  • धनगराचे आयुष्य समजून घेणे (प्राथमिक) 

  • स्थानिक शेतकऱ्याचे आयुष्य व शेतात  वर्षभर चालणारी प्रक्रिया समजून घेणे (प्राथमिक) 

  • एकत्रीकरण :  निसर्गाचे ‘जाळे’ स्थानिक व जागतिक उदाहरणातून समजून घेणे 

  • एकत्रीकरण : माणूस आणि निसर्ग यांच्यातील संबंधाबद्दल आपण काय सांगू शकतो? आपण निसर्गावर अवलंबून आहोत की स्वतंत्र आहोत? 

 

दुसरीच्या अभ्यासक्रमात या सर्व संकल्पना प्राथमिकरीत्या मांडायचा प्रयत्न करावा. त्या शिकविण्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र मिळून अनेक शैक्षणिक कृती तयार करू शकतात. अशा सर्व कृतींचे स्वरूप स्थानिक निसर्ग/परिसंस्था, स्थानिक भूरूपे, स्थानिक हवामान यानुसार बदलेल. (इकोयूनिव्हतर्फे नमुन्यादाखल काही शैक्षणिक कृती प्रकाशित केल्या जातील). 

वरील संकल्पना पालकांनाही निसर्गाबद्दल जास्त डोळसपणे विचार करण्यास भाग पाडतील. शहरी भागात राहणारे पालक व मुले यांच्यासाठी तर हे खूपच महत्वाचे आहे.

bottom of page